४२ वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार; प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या आमिषाने अत्याचार करुन फसवणुक केल्याचा आरोप
A 42-year-old woman was sexually assaulted
४२ वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचारPudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महिलेचे लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अकेंश धनसुखलाल गोहिल (वय. ४७) वर्षांच्या प्रियकराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकेंश हा काळबादेवीच्या जुनी हनुमान गल्ली, शांती भवनचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर एका ४२ वर्षांच्या महिलेवर अत्याचार करुन तिच्याकडून घेतलेल्या दोन लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

A 42-year-old woman was sexually assaulted
सतरा वर्षाच्या मुलीवर सावत्र पित्याकडून लैगिंक अत्याचार; वांद्रे येथील घटना

मुंब्रा येथे राहणारी पिडीत महिला ही पार्लरमध्ये कामाला आहे. गेल्या सतरा वर्षांपासून तिचे अकेंशसोबत प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर विविध ठिकाणी लैगिंक अत्याचार केला होता. तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करुन दोन लाख रुपये घेतले होते, मात्र दिलेले पैसे त्याने वेळेवर तिला परत केले नाही. लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर तिच्याशी वाद घालून तिला मारहाण करत होता. अलीकडेच त्याने तिला लग्न करणार नाही असे सांगितले होते. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अकेंशविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह अपहार, फसवणुक आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप आरोपीला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news