

ईश्वरपूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ ईश्वरपूर येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत डॉ. स्मिताताई जाधव यांना ईश्वरपूर शहरातून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
भाजपचे नेते विक्रम पाटील म्हणाले, ईश्वरपुरातून महायुतीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष केदार पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेतील, असे सांगत पूर्ण ताकदीने प्रचार राबवणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी दादा पाटील, प्रसाद पाटील आणि प्रियांका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस ईश्वरपूर शहर भाजप अध्यक्ष संदीपराज पवार, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, मोहन वळसे, अल्ताफ तहसीलदार, रफिक तांबोळी, दिग्विजय उरणे, मनीषा पाटील, शुभांगी पाटील, संजय हवलदार, संजय पोरवाल, अशोक देसाई, प्रदीप पोळ, चिन्मय वळसे, विराज राजमाने आदी उपस्थित होते.