Vijay Tad murder case : माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत मुख्य सूत्रधार

Vijay Tad murder case : माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत मुख्य सूत्रधार
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे जत येथील माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (Vijay Tad murder case) यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार जतचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत आहेत. त्याच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली अटक केलेल्या चौघांनी दिली आहे. संशयित सावंत फरार आहे. ही सर्व माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हत्येमागचेे कारण स्पष्ट झाले नाही. हत्या सुपारी देऊन झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावंतला अटक केल्यावरच हे समजेल, असेही त्यांनी सांगितले. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (27, रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (24, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (24, रा. के. एम. हायस्कूलजवळ, सातारा फाटा, जत) आणि किरण विठ्ठल चव्हाण (27, रा. आर. आर. कॉलेज जवळ, जत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ताड यांची शुक्रवारी गोळ्या झाडून व दगडाने ठेचून भरदिवसा हत्या केली होती. पोलिसांची तीन पथके तयार केली. सुरुवातीस पोलिसांनी जत शहरातील संशयित आरोपी संदीप ऊर्फ बबलू चव्हाण याच्यासह साथीदारावर जत पोलिसांत गुन्हा दाखल केला.

चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळेे त्या अनुषंगाने तपास सुरू केला. संशयितांची माहिती घेतली असता संशयित गोकाक (रा. कर्नाटक) येथे असल्याचे समजले. पोलिसांनी चौघांनाही गोकाक येथून ताब्यात घेतले. चौघांनी सावंत याच्या सांगण्यावरून ताड यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी आता सावंतचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याची चौकशी करण्यात येत आहे.

एलसीबीचे संदीप नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, दीपक गायकवाड आदिंचा कारवाईत सहभाग होता.

अटकेतील तिघे सराईत गुन्हेगार (Vijay Tad murder case)

डॉ. तेली यांनी सांगितले, अटकेतील चौघांपैकी तिघे सराईत गुन्हेगार आहेत. बबलू उर्फ संदीप चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2018 मध्ये त्याच्यावर एक वर्षासाठी स्थानबद्धची कारवाईही केली होती. निकेश उर्फ दाद्या मदने याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी असे चार गंभीर गुन्हे विश्रामबाग, सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण, जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत. आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा एक गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल आहे.

रेकी करून गोळ्या झाडल्या

डॉ. तेली म्हणाले, संशयितांनी हत्येअगोदर रेकी केली. ताड यांच्यावर बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. त्याशिवाय दगडानेही ठेचले. बंदूक ही मध्यप्रदेशमधून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news