कोयत्याने हल्ला करून लुटणार्‍या तिघांना अटक

विश्रामबाग पोलिसांची कारवाई; मोबाईल, सोने जप्त
Police Arrested Criminals in Sangli
सांगली : विश्रामबाग पोलिसांनी जबरी चोरीतील तिघांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. Pudhari Photo

कोयत्याने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटणार्‍या तिघांना अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून दोन मोबाईल व सोन्याची बाली असा 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय 24, रा. जयभीम कट्ट्यामागे इंदिरानगर, सांगली, मूळ रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ), राकेश शिवलिंग हदीमणी (वय 24, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) व विशाल मुरारी निशाद (वय 23, रा. विठ्ठलनगर, सांगली, मूळ रा. मिर्झापूर, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Police Arrested Criminals in Sangli
Nashik Crime News | कोयता गॅंग आठ दिवसांपासून मोकाट

फिर्यादी अरबाज झाकीर जमादार (रा. ओंकार कॉलनी, हनुमाननगर, कुपवाड) व त्याचे दोन मित्र दि. 16 रोजी रात्री पटेल चौकातून दुचाकीवरून घरी निघाले होते. इंदिरानगरमधील पडक्या बंगल्यासमोर त्यांना तिघा संशयितांनी अडवून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यांच्याकडील दोन मोबाईल व 2 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाली हिसकावून घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Police Arrested Criminals in Sangli
पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 36 लाखाला लुबाडले

या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी विश्रामबाग पोलिसांना दिेले होते. उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. पथकातील संकेत कानडे, योगेश पाटील, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांना चोरीतील संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून श्रीकृष्ण कलढोणे व विशाल निशाद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता राकेश हदीमणीचे नाव समोर आले. तपास उपनिरीक्षक निवास कांबळे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news