पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 36 लाखाला लुबाडले

भोंदू महाराजाला बेड्या; सातारा पोलिसांची कारवाई
Shackles to the hypocrite Maharaja; Action of Satara Police
भोंदू बाबाला सातारा पोलिसांकडून अटकRepresentive Image

सातारा : पैशांचा पाऊस पाडून कोट्यवधी रुपये देतो, वीज पडलेले काश्याच भांडं कंपनीला देऊन कोट्यवधी रुपये मिळतील, असे सांगून वेळोवेळी तब्बल 36 लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी कपडे भवानवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड येथील भोंदू महाराजास सातारा शहर पोलिसांनी अटक केली. पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज असे त्या संशयिताचे नाव आहे. अमित श्रीरंग शिंदे (वय 42, रा. नाडे, ता. पाटण. सध्या रा. रविवार पेठ सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 2021 ते 2023 या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. अमित शिंदे शेतकरी आहेत. उसतोड टोळी आणण्यासाठी ते 2021 मध्ये पोलादपूर येथे गेले होते. तेथे पंढरीनाथ पवार ऊर्फ काका महाराज याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर काका महाराजाने हातकणंगले येथील एका माणसाकडे वीज पडलेले काश्याच भांडं आहे. त्याचा वापर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केला जातो. कंपनी अशा भांड्यासाठी 500 ते 1000 कोटी रुपये देते. ते भांडे घेण्यासाठी लाखो रुपये लागतील. तू ते पैसे दिले तर ते विकून त्यातून पैसे मिळतील, असे भोंदू महाराजाने सांगितले. त्यावेळी अमित यांनी पैसे नसल्याचे सांगितले.

Shackles to the hypocrite Maharaja; Action of Satara Police
Nashik | भोंदू बाबाला बसण्यासाठी बनवली बिबट्याच्या कातडीची गादी… त्यानंतर काय झालं

या घटनेनंतर काका महाराज आणि अमित यांच्यात वारंवार फोनवर बोलणे होत होते. काश्याच्या भांड्याला गिर्‍हाईक आल्याचे सांगून भोंदू महाराज तक्रारदारांच्या सातार्‍यातील घरी आला होता. तेंव्हा त्या काश्याच्या भांड्यावर आलेले जेलीचे आवरण काढण्यासाठी एक विशिष्ट कोट लागतो. तो कोट कंपनीचे लोक भाड्याने घेवून येतात. आवरण काढल्यानंतर कंपनीचे लोक लगेच 50 कोटी रुपये देतील असे आमिष दाखवले.

त्या कोटचे भाडे व कंपनीचे लोक बोलवण्यासाठी 14 लाख रुपये लागतात असे सांगून भोंदूबाबाने पुन्हा पैसे मागितले. यामुळे अमित यांचा भोंदूबाबावर विश्वास बसला व त्यांनी 4 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर भोंदूबाबाने 5 वेळा हातकणंगले, पन्हाळा येथे अघोरी पूजा व जोदुटोणा एकांतात करावा लागेल असे सांगून वेळोवेळी एकूण 28 लाख रुपये रोख व ऑनलाईन स्वरुपात घेतले. पैसे लवकरच मिळतील अशी अपेक्षा असताना भोंदूबाबा प्रत्येकवेळी ते भांडं गरम झालं आहे. भांड्यावर साप आले आहेत. शेवटच्यावेळी भांडं गरम होवून ते भांडं जळाले असल्याचे सांगितले. यामुळे अमित शिंदे यांनी भोंदूबाबाकडे नोव्हेंबर 2022 पासून 28 लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावला.

Shackles to the hypocrite Maharaja; Action of Satara Police
कोल्हापूर : उदंड जाहले भोंदू… म्हणे, आम्ही नामी वैदू!

जानेवारी 2023 मध्ये काका महाराजाने अमित यांना जुन्या गोल नाण्यावर जादुटोणा करुन एक केमीकल टाकल की त्याचे आर.पी. क्वॉईन तयार होतात. त्या क्वॉईनची कंपन्यांना गरज असते व त्यातून चांगले पैसे मिळतील. ते पैसे मिळाले की सर्व पैसे परत करतो, असे सांगितले. या क्वॉईनसाठी 4 लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगून पुन्हा पैसे घेतले. महाराजाने काळी बाहुली, मंत्र, लिंबू, अंगारे, हळदी कुंकू याचा वापर करुन जादुटोणा क्वॉईन तयार केले. मात्र कंपनीने ते क्वॉईन घेतले नसल्याचे सांगितले.

काका महाराजाने वेळोवेळी 36 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमित यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोनि राजेंद्र मस्के यांनी तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण विभागाला सांगितले. या पथकाने भोंदू महाराजाला अटक केली आहे. या कारवाईत फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Shackles to the hypocrite Maharaja; Action of Satara Police
पाय धुवून पाणी प्या, तुमचे आयुष्य 30 वर्षे; भोंदू महिलेचा अंनिसकडून पर्दाफाश

अनेकांना घातल्या टोप्या...

भोंदू महाराजावर शहर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या घटनेची व्याप्ती मोठी असल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर, सातारा व रायगड जिल्ह्यांत आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. तसेच जादूटोणा करण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यांत भोंदूबाबा फिरल्याचे समोर येत आहे. याबाबत कोणाची फसवणूक झाली असेल, तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news