सांगली : तासगावात आजी माजी खासदारांत जोरदार हमरीतुमरी

प्रशासकीय कार्यक्रमात गदारोळ; बाह्यवळण रस्त्याच्या श्रेयवादातून प्रकार
 Vishal Patil Sanjay Patil dispute
विशाल पाटील व संजय पाटील यांच्यात वाद झाला.
Published on
Updated on
प्रमोद चव्हाण

तासगाव शहर : रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच मंजूर केलेल्या तासगाव शहराच्या बाह्यवळण रस्त्यावरुन सोमवारी (दि.७) तासगाव येथील खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी माजी खासदार पाटील यांच्या गटातील तरुणांनी चांगलाच गदारोळ घातला. तर खासदार विशाल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडून आला. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होते.

 Vishal Patil Sanjay Patil dispute
सांगली : तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीचे उद्या उद्घाटन

खासदार विशाल पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी वाहतूक मंत्री गडकरी मला म्हणाले होते की, रोहित पाटील यांना रिंगरोड मंजूर केला असल्याचा निरोप द्या, असे कार्यक्रमात सांगून रोहित पाटील यांचे रिंगरोडचे श्रेय असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले. यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र कोणत्या कार्यक्रमात काय बोलावे याचे भान ठेवा, प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचा प्रकार विशाल पाटील यांनी बंद करावा. सन्मान दिला जातोय, त्याला पात्र रहा. बाजारबुणगापणा कमी करा. राजकारणातील किती नौटंकी करावी, असे म्हणत विशाल पाटील यांना प्रतिक्रिया दिली. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विशाल पाटील समोर आले असता माजी खासदार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गदारोळ घालून विशाल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला.

 Vishal Patil Sanjay Patil dispute
सांगली : जिल्ह्यात 137 मंडळांना डीजे पडला महागात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news