Tasgaon municipal building inauguration
तासगाव नगरपालिकेची नूतन प्रशासकीय इमारत

सांगली : तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीचे उद्या उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
Published on

तासगाव शहर : तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला असून उद्या (दि.७) सकाळी १० वाजता पालिकेच्या नवीन इमारतीचे अनावरण पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजय पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स. पागे यांचे नाव या इमारतीला देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

Tasgaon municipal building inauguration
Nitin Gadkari | गडकरी यांनी सातारा, कोल्हापूर- सांगली रस्त्याची केली हवाई पाहणी

तासगाव पालिकेच्या प्रशासकिय इमारतीला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. माजी खासदार संजय पाटील यांची पालिकेत सत्ता असताना या कामाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी या इमारतीसाठी प्रयत्न केले होते. १३ कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत ५० हजार स्क्वेअर फूटमधे चार मजली आहे. पार्किंग, सुरक्षा, व्यापारी गाळे, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व विभागांचे सभापती यांची सुसज्ज केबिन, बाहेर आरामदायी प्रतीक्षा कक्ष अशी रचना करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांच्या रोजच्या कामासाठीचे विभाग तिसऱ्या मजल्यावर करण्यात आलेले आहेत. २०१६ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर निधी वेळेवर न मिळाल्याने व कोरोनामुळे इमारतीचे काम रेंगाळले होते. मुख्याधिकारी पाटील यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा करून हे काम पूर्ण केले. यामुळे तासगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. दरम्यान तासगाव नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे. पश्चिम महाराष्ट्रात ही इमारत उल्लेखनीय ठरली आहे.

Tasgaon municipal building inauguration
सांगली : बांधकाम कामगारांचा लाभ ठेकेदारांच्या घशात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news