Sangli Shirala|सोयाबीन काढणी-मळणीचा खर्चही निघेना

Soybean production drops by 50 percent amid labor shortage-सोयाबीन काढणी-मळणीचा खर्चही निघेना
Sangli Shirala
शिराळा : कापरी परिसरात सोयाबीन काढणी व यंत्राच्या साहाय्याने मळणी करण्यात व्यस्त असलेले शेतकरी.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

शिराळा तालुक्यात सोयाबीन काढणी व मळणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, पीक भरणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह भात व भुईमूग पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याने शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेली मजुरी आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

खरीप हंगामात सोयाबीन, भात आणि भुईमूग पिकांना पावसाच्या उघडिपीचा फटका बसला आहे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर परिणाम झाला. पावसाच्या खंडानंतर सोयाबीनची काढणी एकाचवेळी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. मजूर मिळत नसल्यामुळे काढणीला विलंब होत असून, शेतातच सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे गळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सोयाबीन काढणीसाठी मजूर रोजंदारीने किंवा एकराच्या दराने काम करतात. काढलेले सोयाबीन मळणीच्या ठिकाणी लांब अंतरावरून वाहून न्यावे लागत असल्यास वाहतूक खर्चातही वाढ होते. सध्या काढणी व मळणीसाठी एकरी चार ते पाच हजार रुपये खर्च येत आहे. उत्पादन घटल्याने हा खर्च भरून निघणार कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

Sangli Shirala
Sangli DCC Bank Election | सांगली जिल्हा बँक निवडणूक: गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढणार; राजकीय हालचालींना वेग

शेतकऱ्यांची लूटच

सोयाबीन काढणी व मळणीसाठी रोजंदारीवरील मजुरांना प्रतिदिन ३०० ते ४०० रुपये द्यावे लागत असून, ने-आण करण्याचा खर्च वेगळा आहे. मळणीसाठी प्रत्येक पोत्यामागे दोन पायली सोयाबीन द्यावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. ट्रॅक्टरच्या एका खेपेसाठी ४०० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. ही जणू लूटच सुरू आहे.

Sangli Shirala
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सांगली बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news