ओबीसींच्या आरक्षणासाठी एकजूट दाखवा

प्रकाश शेंडगे यांचे आवाहन; सांगलीत ओबीसी प्रतिनिधींची बैठक
OBC Reservation
सांगली : ओबीसींच्या बैठकीत बोलताना माजी आमदार प्रकाश शेंडगे. शेजारी संगीता खोत, अरुण खरमाटे, विष्णू माने, आकाराम मासाळ आदी. PudharI Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

ओबीसीचे आरक्षण वाचविण्यासाठी एकजूट दाखवा अन्यथा सर्व गमावून बसाल, असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.येथील महसूल भवनामध्ये बुधवारी सांगली जिल्ह्यातील आजी- माजी ओबीसी लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आ. शेंडगे बोलत होते.

OBC Reservation
OBC Reservation: हाके-वाघमारे यांची ओबीसी संवाद यात्रा

शेंडगे म्हणाले की, शासनाने मराठा समाजाच्या सगेसोयरेबाबत शासकीय अध्यादेश काढला आहे. याची अंमलबजावणी करू द्यायची नाही. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्या आरक्षणावरील संकट टळणार नाही. कोणीही दहशतीखाली न राहता आपले आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. पक्षविरहित लढा उभारण्याची गरज आहे. यावेळी माजी महापौर संगीता खोत, अरुण खरमाटे, संजय विभूते, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, संग्राम माने, अरुण खरमाटे, कविता साळी, माजी नगरसेवक विष्णू माने आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी जि. प. सदस्य आकाराम मासाळ, विठ्ठल खोत आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news