Sahyadri Express robbery : दरोडेखोरांचा कसून शोध सुरू

दरोडेखोर सराईत : स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडथळे
Sahyadri Express
Sahyadri Express
Published on
Updated on

मिरज : कोल्हापूर-पुणे विशेष (सह्याद्री) एक्स्प्रेसवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. यासाठी मिरज रेल्वे पोलिसांसह कराड पोलिसांची पथके रवाना केली आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याने तपासामध्ये अडथळे येत आहेत. तसेच दरोडा पडला त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वेत नसल्याचे समोर आले आहे.

शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास शेणोली (ता. कराड, जि. सातारा) येथे कोल्हापूर-पुणे विशेष सह्याद्री एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यासाठी टोळीने सुरुवातील सिग्नल वायर कापली. हा प्रकार काही क्षणातच कराड येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. लगेचच रेल्वेने आपत्कालीन सिग्नल यंत्रणा सुरू केली. परंतु सराईत दरोडेखोरांच्या टोळीने सोबत आणलेली शाल सिग्नलवर गुंडाळली. सिग्नलच दिसत नसल्याने पायलटने रेल्वे थांबवली. त्यानंतर रेल्वेत घुसलेल्या दरोडेखोरांनी एस 3 बोगीमधून प्रवास करणाऱ्या मीना ओमापती आणि आशा पवार या दोन महिलांच्या मंगळसूत्राला हिसडा मारला. त्यानंतर जनरल बोगीतून प्रवास करणारे रंजन साहू यांचा मोबाईल हिसकावला. यामुळे गोंधळ उडाल्याने दरोडेखोरांच्या टोळीने पोबारा केला.

दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज जंक्शनमधून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. परंतु श्वान त्याच जागी घुटमळले. दरम्यान सातारा, कराड, वाठार, लोणंद रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासामध्ये अडथळे येत असल्याचे मिरज रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, दरोडेखोर हे स्थानिक असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. मिरज रेल्वे पोलिस, सातारा रेल्वे सुरक्षा दल आणि कराड पोलिसांची पथके दरोडेखोरांचा मागावर रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news