Dr. Smita Jadhav| डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन

प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र प्रतिनिधी; बूथवर प्रमुख नेमून प्रचार गतिमान
Dr. Smita Jadhav
डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन
Published on: 
Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर भाजपने सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे.

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधी, प्रत्येक बूथसाठी प्रमुख आणि जिल्हा ते मंडळ स्तरावरील पदाधिकारी या सर्वांमध्‍ये समन्वय अशी प्रचाराची व्यूहरचना आखण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच उमेदवार आहोत, या भावनेतून प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन पक्षाच्‍या सातार्‍यात झालेल्‍या बैठकीत पदाधिकार्‍यांनी केले.

डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारासाठी सातारा शहरात भाजपसह महायुतीने बैठकांचा धडाका लावला आहे. ठिकठिकाणी झालेल्‍या बैठकीस भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, वैशाली टंगसाळे, सरचिटणीस विक्रम बोराटे, नगरसेविका रीना भणगे, सरचिटणीस अमोल टंगसाळे, दीपक क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस नितीन कदम, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, सुनिशा शहा, अमर बेंद्रे, कुणाल मोरे, शुभांगी महाबळेश्वरकर, वैष्णवी कदम आणि कुंजबला खंदारे यांच्यासह पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीवेळी प्रचार यंत्रणेची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली. प्रत्येक मतदारामागे एक प्रतिनिधी, तसेच प्रत्येक बूथसाठी स्वतंत्र प्रमुख अशी रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांशी नियमित संपर्क ठेवणे, त्यांच्यापर्यंत उमेदवाराची भूमिका पोहोचवणे आणि प्रचाराचे नियोजन प्रभावीपणे राबवणे शक्य होत आहे.

'मीच उमेदवार' या भावनेतून काम करण्याचे आवाहन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले, त्याच पद्धतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी. उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकत नसल्याने कार्यकर्त्यांनीच उमेदवाराची भूमिका पार पाडत मतदारांशी संवाद साधावा. 'मीच उमेदवार आहे', या भावनेतून प्रत्येकाने प्रचारात योगदान द्यावे, असे मार्गदर्शन बैठकीत पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले. नियोजनबद्ध प्रचार, प्रत्येक मतदाराशी संपर्क आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय या त्रिसूत्रीच्या आधारे डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याची तयारी भाजपने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news