विशाल यांच्याबाबत त्यांचे नेतेच ठरवतील : संजय पाटील

विशाल यांच्याबाबत त्यांचे नेतेच ठरवतील : संजय पाटील
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे कोणा-कोणाला नेते म्हणू लागले आहेत. त्यांच्या बोटीत बसून पलीकडे जाण्याचा त्यांचा विचार आहे. पण काळ ठरवेल, काय घडतंय ते दिसेल. त्यांची पात्रता ठरवणारे त्यांचे त्यांचे नेते ठरवतील, असे सूचक वक्तव्य खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाजपचे संजय पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभेचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केली होती. त्यावर खासदार पाटील म्हणाले, विशाल पाटील यांचा सुरू असलेला प्रवास, त्यांच्या भेटीगाठी हे पाहिले, तर माझ्या दहा टक्केही प्रवास त्यांनी केलेला नाही. कामांमध्येही ते खूपच पाठीमागे आहेत. बरोबरच्याला उत्तर द्यायचे असते. मी त्यांना काय उत्तर देणार! आता ते कोणा-कोणाला नेता म्हणत आहेत. त्या बोटीत बसून पलीकडे जाण्याचा विचार करत आहेत. मात्र काळ ठरवेल, काय घडतेय ते.

विशाल पाटील यांना काही तरी साधायचे आहे. मात्र लोक वेडे नाहीत. विशाल पाटील यांची पात्रता, त्यांची प्रवृत्ती, त्यांचे वागणे या सर्वांचा विचार होईल. त्यांची पात्रता ठरवणारे त्यांचे त्यांचे नेते ठरवतील, असेही खासदार पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news