सांगली : ‘यशवंत’च्या कामगारांचे १७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच : आजची बैठकही निष्फळ

सांगली : ‘यशवंत’च्या कामगारांचे १७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच : आजची बैठकही निष्फळ

विटा, पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांचे आंदोलन १७ व्या दिवशीही सुरू आहे. शुक्रवारी (दि.१७) येथील तहसील कार्यालयात जिल्हा बँक, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात पुन्हा चर्चा झाली. मात्र त्यातून सकारात्मक निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच आहे.

नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबतच्या प्रश्नावर विट्यातील महसूल भवनासमोर खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील साखर कामगारांचे गेले १६ दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे. साखर कामगारांच्या मतानुसार, २००६ ते २०१२ या कालावधीतील एकूण १ हजार १८० कामगारांचे सर्वांचे मिळून ८ कोटी २८ लाख रुपये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आहेत. तेव्हापासून आमची ही रक्कम जिल्हा बँक वापरत आहे. ही रक्कम आता दहा वर्षानंतर तरी मिळाली पाहिजे, अशी साखर कामगारांची मागणी आहे.

दरम्यान, गेल्या ८ फेब्रुवारीला सांगलीत झालेली चर्चा थांबल्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा तहसील कार्यालयात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सतीश सावंत, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, भाऊसाहेब यादव, आनंदराव नलावडे, अनिल घोरपडे, अनिल महाडिक, कॉम्रेड अॕड. सुभाष पाटील यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. परंतु यातूनही सकारात्मक निर्णय आल्याने साखर कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आज झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचे सतीश सावंत यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर १३ फेब्रुवारी रोजी सपकाळ हे बँक प्रतिनिधी म्हणून नेमले आहेत. त्यांनी साखर कामगारांची एकूण किती रक्कम आहे,

पुढिल दहा दिवसांत बँकेने आम्हाला कामगारांना कधी आणि कसे पैसे देणार याबाबतचे लेखी पत्र तहसीलदारांना द्यावे ते पत्र आम्हाला तहसीलदार स्वतः देतील त्यानंतरच आम्ही आंदोलन थांबवू. अन्यथा येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत असे पत्र आम्हाला न मिळाल्यास २७ फेब्रुवारी रोजी सोमवारी विट्यामध्ये चक्काजाम आणि रास्ता रोको केले जाईल. त्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाहीत, अशी भूमिका जाहीर केली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news