Walwa  Yedenipani Phata firing
येडेनिपाणी फाटा येथे गोळीबार झालेल्या ठिकाणी तपास करताना पोलीस (Pudhari Photo)

Sangli Crime | येडेनिपाणी फाटा येथे एकावर गोळीबार : पोटात, पाठीत घुसल्या गोळ्या

भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे
Published on

Walwa Yedenipani Phata firing

कुरळप : वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाटा येथे आज (दि.२२) दुपारी एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अर्जुन शंकर थोरात (वय 52 ) हे गंभीर जखमी झाले आहेत. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

थोरात यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूरचे पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

Walwa  Yedenipani Phata firing
Sangli Crime: सांगली, अंकलीत जुगारावर छापे

हल्लेखोराने गोळीबार करून पलायन केले आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. जखमी थोरात यांच्या पोटात व पाठीत गोळ्या लागल्या आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news