

सांगली : सांगली शहर व अंकली फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी चौघांना अटक केली. इम्रान रियाज जमादार (वय 42, रा. हनुमाननगर, सांगली), मलिक असिफ बलबंड (31, रा. खणभाग), बाळासाहेब रामचंद्र कोलप (47, रा. इनामधामणी), सचिन रजनीकांत भाटे (48, रा. कोल्हापूर रस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
इम्रान जमादार हा संपत चौकात, मलिक बलबंड हा अहिल्यानगर येथे, बाळासाहेब कोलप हा अंकली फाटा येथे, तर सचिन भाटे हा हरिपूर रस्त्यावर जुगार अड्डा चालवत होता. याची माहिती मिळाल्यानंतर संजयनगर, सांगली शहर आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 4 हजार 670 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.