

Sangli Vita Fridge Cylinder Blast:
सांगलीतील विट्यात फ्रीजच्या सिलेंडरटा स्फोट होऊन चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज (दि.१० नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. आग जिथं लागली ते स्टील फर्निचर अँड फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं. मृतांमध्ये २ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एका लहान मुलाचा देखील मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दुकानचे मालक विष्णू पाडुरंग जोशी, त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी, मुलगी प्रियांका योगेश इंगळे (मुळगाव विटा, सासर गोवा) आणि विष्णू जोशी यांची नात सृष्टी योगेश इंगळे या लहान मुलीचा समावेश आहे.
तर विष्णू जोशी यांचा मुलगे मनिष विष्णु जोशी, सूरज विष्णु जोशी हे दोघे भाजून गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घरात १० नोव्हेंबर रोजी लग्नाचा कार्यक्रम होता अशी देखील माहिती मिळत आहे. ज्या मनिषाचं लग्न आहे ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
महाराष्ट्र होमगार्ड लखन भुमकर यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं, 'ज्यावेळी मी गावात आलो त्यावेळी मला धुराचा लोट दिसला. घटनास्थळी पोहचल्यावर पहिल्या मजल्यावर तीन मुलं ओरडत असताना दिसली. मी सरळ वर गेलो त्यानंतर तेथील एका मुलाला खाली आणलं. मात्र आग मोठ्या प्रमाणावर लागल्यामुळं आम्हाला कुठंच जाता येत नव्हतं. आम्ही फायर ब्रिगेडच्या पाईपनं आग विझवली मात्र वाफ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आम्हाला काही करता आलं नाही.
ते पुढे म्हणाले की, आम्ही तीन भिंती फोडल्या त्यानंतर फायर ब्रिगेडचे एक कर्मचारी आणि आम्ही आत गेल्यावर तिथून आम्ही एक पुरूष दोन महिला अन् एक ५ ते ६ वर्षाचे लहान मुल त्यांना आम्ही बाहेर काढलं.' आग आणि धुर मोठ्या प्रमाणावर असल्यानं मदत कार्यात व्यत्यय आल्याचं मदत करणाऱ्यांनी सांगितलं.