Police Dog Death | सांगली पोलिस दलातील श्वान 'कूपर'ला शेवटचा सलाम; हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Sangli Police | शासकीय इतमामात शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार
  Sangli police dog Cooper heart attack
सांगली पोलिस दलातील श्वान 'कूपर'(Pudhari Photo)
Published on
Updated on

Sangli police dog Cooper heart attack

सांगली : सांगली पोलिस दलात गेली सहा वर्षे अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉबरमन प्रजातीच्या श्वान 'कूपर'चा सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या निधनाने संपूर्ण पोलिस दल शोकाकुल झाले. मंगळवारी दुपारी सशस्त्र मानवंदनेसह शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्याचा हस्तक अंमलदार (हॅण्डलर) शबाना अत्तार यांना तर हुंदका आवरत नव्हता.

५ वर्षे ११ महिन्यांचा कूपर हा फक्त श्वान नव्हता, तर पोलिसांचा विश्वासू साथी, संवेदनशील आणि तल्लख शोधक होता. ६ ऑगस्ट २०१९ रोजी जन्मलेला कूपर पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात घडला. ३० ऑक्टोबर २०२० नंतर तो सांगली पोलिस दलात दाखल झाला. गेल्या सहा वर्षांत कूपरने तब्बल २८७ गुन्ह्यांच्या तपासात सहभाग, तर १३ गुन्ह्यांत निर्णायक भूमिका बजावली. जत (२०२१) आणि हरीपूर (२०२२) येथील अनोळखी हत्या प्रकरणात कोणताही स्पष्ट धागा नसताना कूपरने आरोपींपर्यंत पोलिसांना नेले.

  Sangli police dog Cooper heart attack
Almatti Dam issue | अलमट्टीप्रश्नी सांगली पाटबंधारे कार्यालयावर 10 जुलैला मोर्चा

आटपाडीतील धाडसी घरफोडी असो, वा २०२५ मधील ५४ गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची उपस्थिती, कूपर प्रत्येक वेळेस पोलिसांसोबत पावलापावलावर होता. त्याने ३८ गुन्ह्यांत महत्वाचे दिशादर्शन केले. त्याच्या कुशाग्रशक्तीमुळे अनेक गुन्हेगार गजाआड गेले. त्याच्या उल्लेखनीय सेवेसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्याचा सत्कार केला होता. पोलिस अधीक्षकांनीही दोनवेळा गौरविले. कूपरची नोकरीतील एकूण कारकीर्द ३६४ गुन्ह्यांच्या मागणीने सजली, त्यात तो ३८७ वेळा घटनास्थळी गेला.

सोमवारी रात्री अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कूपरने अखेरचा श्वास घेतला. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या या 'श्वान वीर'ला मंगळवारी दुपारी पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून निरोप दिला. कूपरचा शेवटचा सलाम डोळ्यात अश्रू आणि हृदयात अभिमान घेऊनच झाला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक सतीश शिंदे, श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एन. एस. मोरे, कुपरच्या हस्तक शबाना आतार, सुहास भोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news