

सांगली : प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे-पाटील, मालन गडदे, प्रशांत पाटील यांचा विजय निश्चित आहे. या भागातील ड्रेनेज, पाण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. सुरक्षिततेच्यादृष्टीने चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रगती कॉलनी व परिसरातील अन्य भागांमध्ये बैठका घेण्यात आल्या. भाजपचे नेते आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार प्रमुख उपस्थित होते. प्रभागात बैठका, पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी यांनी भाजपच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाला आहे. दरम्यान, या भागातील ड्रेनेज, पाणीपुरवठा व अन्य समस्यांबाबत लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेतली जाईल. हे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. भाजपचे चारही उमेदवार प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांच्या अपेक्षांवर ते खरे उतरतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यावर आमदार गाडगीळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी वैभव पाटील, सागर लकडे, अविनाश चोथे, सुनील माणकापुरे, नितीन तावदारे, प्रगती कॉलनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजकुमार मगदूम, उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, अशोक घोरपडे, राजू खोकले, राजू मगदूम, प्रशांत सावर्डेकर, सूर्यकांत भोसले, रामचंद्र सुतार, अनिल पाटील, विनय कोळी, साबु वालीकर, आमशीद कट्टीमणी, गजानन पारसे, भगवान वालीकर, शारदा पाटील, संध्या कोकळे यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.