बागणी; पुढारी वृत्तसेवा : येथे बागणीसह तीन गावांत पारंपरिक रीतीने मोहरमचा सोहळा अलोट उत्साहात झाला. रात्री दहा वाजता पंजे-सवारी भेटी सोहळ्याची सांगता झाली.
बागणी येथे मोठ्या प्रमाणात मोहरम होतो. काकाचीवाडी, रोझावाडी येथेही परंपरेप्रमाणे पंजे, सवार्यांची प्रतिष्ठापना केली होती. शनिवारी मोहरमच्या सकाळी भेटी झाल्या. सायंकाळी मुख्य भेटी होत्या. बागणी ग्रामपंचायतीच्यावतीने मानाच्या सवार्यांचे मानपान करण्यात आले. सरपंच तृप्ती संदीप हवलदार, उपसरपंच संतोष घनवट, ग्रामविकास अधिकारी कुमार पांडुरंग भिंगारदेवे यांच्यासह सर्वच सदस्यांनी भेटीच्या सोहळ्याचे जय्यत नियोजन केले होते. सायंकाळी मानकरी सरपंच तृप्ती हवलदार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पीर उठविण्यात आले. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुभाष हवलदार, माजी सरपंच राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. किल्ला भागातील मंत्री सरकार सवारीचा सोहळ्यात प्रथम मान आहे. रोझावाडीतील मानाच्या सवार्यांबरोबर भेटी झाल्या.
दरम्यान, प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता. जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, रोझावाडीचे सरपंच जुबेर पीरजादे, काकाचीवाडीच्या सरपंच रोहिणी सुनील जाधव, सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी ढोले, बागणी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय अण्णासाहेब पवार यांच्यासह मान्यवरांनी भाविकांचे स्वागत केले. मान्यवरांचा सरपंच हवलदार, उपसरपंच घनवट यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी काली मस्जीद , मोमीन मोहल्ला, शिकलगार वाडा, सुतारवाडा, फकीर वाडा, सय्यद सवारी, रोझावाडी येथे पीर अब्दुलकादर बादशहा साहेब यांच्या मानाच्या सवारीची तसेच काकाचीवाडी येथे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर लाडलेसाहेब सवारी, फकीर, महाब्री सवार्यांच्या भेटीचा सोहळा झाला.