Sangli News : आरग येथे विजेच्या धक्क्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू

पिकावर औषध फवारताना दुर्घटना
Sangli News : आरग येथे विजेच्या धक्क्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

मिरज/आरग : आरग (ता. मिरज) येथे शेतात पिकावर औषध फवारणी करीत असताना तेथील विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. विशाल पांडुरंग माळी (वय 26, रा. आडवा रस्ता, बोलवाड) आणि अथर्व रवींद्र माळी (वय 15, रा. आरग) अशी मृतांची नावे आहेत.

विशाल आणि अथर्व हे मामा-भाचे आरग येथील माळी वस्ती परिसरात वांग्याच्या प्लॉटवर औषध फवारणीचे काम करत होते. या शेताच्या अगदी शेजारीच महावितरणचा ट्रान्स्फॉर्मर आहे. औषध फवारणीचे काम सुरू असताना अचानक दोघांनाही विजेच्या तारेचा स्पर्श झाला व दोघांनाही विजेचा जोरदार झटका बसला. वीजप्रवाह तीव्र असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

विशाल आणि अथर्व हे नात्याने मामा-भाचे होते. अथर्व लहान असल्याने बोलवाड येथील त्याचे मामा विशाल हे आरग येथे येऊन त्याच्या शेतीची देखभाल पाहत होते.

दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांना विजेचा धक्का नेमका कसा बसला, याचा तपास आता करण्यात येत आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी माळी यांच्या शेताकडे धाव घेतली. दोघांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news