Sangli Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

पेठ -शिराळा रस्त्यावर पतीसमवेत दुचाकीवरून जाताना बिबट्याची झडप
Leopard Attack
Leopard Attack
Published on
Updated on

कासेगाव : पेठ-शिराळा रस्त्यावर गोळेवाडीजवळील जनाई गार्डनजवळ दुचाकीवर बिबट्याने झडप घालत पंजा मारल्याने अर्चना प्रमोद पाटील (वय 34, रा. रेठरेधरण) या जखमी झाल्या. प्रमोद पाटील, अर्चना पाटील व त्यांचा सहावर्षीय मुलगा पेठकडून दुचाकीवरून रेठरेधरणकडे निघाले होते. दरम्यान जांभुळवाडीच्या दिशेने आलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. पाठीमागे बसलेल्या अर्चना यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. बिबट्याची नखे पायाला नखे लागून त्यांना जखम झाली आहे. या हल्ल्यानंतर वाहनांचा प्रकाशझोत पडल्याने बिबट्या बाजूच्या शेतात पसार झाला. नागरिकांनी त्यांना तत्काळ पेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

Leopard Attack
Leopard attack : शहापुरात बिबट्याची दहशत कायम; हल्ल्यात गाईचा मृत्यू

घटनेनंतर लोकांनी वनविभागास कळवले. मात्र त्यांनी वेळेवर दखल घेतली नाही. आ. सत्यजित देशमुख यांच्या कानउघाडणीनंतर वन विभागाला जाग आली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल दादाराव बर्गे, वनरक्षक विशाल डुबल, क्षेत्रीय सहा. शहाजी पाटील, शिवाजी खोत, अनिल पाटील, रेस्क्यू टीमचे युनूस मणेर, पांडूरंग उगळे, गौरव गायकवाड यांनी परिसरात भेट दिली. गेल्या काही महिन्यांपासून जांभुळवाडी परिसरात बिबट्याच्या नर-मादीचा वावर आहे. त्यांच्याकडून हल्ल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

Leopard Attack
Leopard attack news | सारोळा शिवारात बिबट्याचा वावर; कुत्रा ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news