सांगली : हुबालवाडी येथे शेतकऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न

बिबट्या
बिबट्या

बहे : पुढारी वृत्तसे‍वा : वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथे शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१२) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. अरविंद सदाशिव हुबाले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी अरविंद हुबाले हे हुबालवाडी- कापूसखेड शिवारात आपल्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना उसातून गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता समोर त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने हुबाले यांच्यावर झेप टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी तेथून धूम ठोकली. या घटनेनंतर परिसरात लोकांची गर्दी जमली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे व सातत्याच्या दर्शनाने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news