

कुपवाड : महापालिका निवडणुकीत कुपवाड प्रभाग एक, दोन आणि आठ मधील दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. या तीनही प्रभागात भाजपा, शिंदे शिवसेना गट, महाविकास आघाडी (काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट, अजित पवार राष्ट्रवादी गट) अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली होती.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या पक्षीय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक एक - भाजपा पॅनेल : रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री पाटील, चेतन सूर्यवंशी. काँग्रेस - राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनेल : शेडजी मोहिते, रईसा रंगरेज, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, प्रियंका विचारे. शिवसेना शिंदे गट पॅनेल -अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, संदीप तुपे, अपक्ष ः विश्वजित पाटील
प्रभाग क्रमांक दोन : भाजपा पॅनेल प्राजक्ता धोतरे, प्रकाश ढंग, मालुश्री खोत, प्रकाश पाटील, काँग्रेस - राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनेल : सविता मोहिते, अय्याज नायकवडी, प्रेरणा कोळी, समीर मालगावे. राष्ट्रवादी अजित पवार गट : गजानन मगदूम, शिवसेना शिंदे गट : अनिता वनखंडे, सिद्राम दळवाई, शमाबी मुजावर, विनायक यादव, शिवसेना ठाकरे गट : कासम मुल्ला
प्रभाग क्रमांक आठ : भाजपा पॅनेल दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, संजय पाटील राष्ट्रवादी अजित पवार पॅनेल : विष्णू माने, संजय कोलप, पूनम मोकाशी, प्रियांका देशमुख, शिवसेना शिंदे गट : महेश सागरे, जिजाताई लेंगरे, नेत्रा कुरळपकर, स्वप्निल औंधकर, युवराज शिंदे, समाजवादी पार्टी : नितीन मिरजकर.
तीनही प्रभागात बंडखोरी?
कुपवाड शहर प्रभाग एक, दोन आणि आठ या तीनही प्रभागात दिग्गज उमेदवारांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. प्रभाग 1 मधून भाजपचे विश्वजित पाटील, माजी उपमहापौर मोहन जाधव यांची कन्या विद्या जाधव, सायराबानू मुलाणी, अश्विनी पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केले.
प्रभाग दोनमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तानाजी गडदे यांच्या पत्नी मनीषा गडदे, अजित पवार गटाचे दादासाहेब कोळेकर यांच्या पत्नी ज्योती कोळेकर, शुभांगी पवार, दाऊद मुजावर, मेहराजबी मकानदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग आठमधून काँग्रेसचे रवींद्र खराडे, भाजपाच्या कल्पना कोळेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.