Vita Protest | खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; विट्यात सर्वपक्षीय आंदोलन

सरसकट कर्जमाफी, वीजबिल माफी आणि पुरेसा वीजपुरवठा देण्याची मागणी
Khanapur Taluka Drought Affected Farmer Demands
Khanapur Taluka Drought Affected Farmer DemandsPudhari
Published on: 
Updated on: 

Khanapur Taluka Drought Affected Farmer Demands

विटा : खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी विटा येथील महसूल भवनासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलनावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मनोज देवकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण आणि शहराध्यक्ष सुरेश पाटील प्रमुख उपस्थित होते. मनोज देवकर यांनी खानापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा मांडला. ते म्हणाले, ‘‘आज पतंगराव कदम असते, तर ‘दुष्काळ जाहीर करा’ म्हणून आंदोलन करण्याची वेळ आली नसती. आजचे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर कधी दिसतात का? येथील लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना तालुक्यातील दुष्काळाची कल्पना नाही.’’

Khanapur Taluka Drought Affected Farmer Demands
Sangli News : आरोग्य अधिकाऱ्यांवर आता थेट कारवाई

रेवणगाव, रेणावी तसेच घाटमाथ्यावरील वाड्यांमध्ये मूग आणि सोयाबीनची पिके करपून गेली आहेत. ज्या भागात मुबलक पावसात एकरी ८० ते १०० टन उसाचे उत्पादन मिळायचे, तेथे आता ३० टन उत्पादन होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. माहुली, वेजेगाव परिसरात दिवसातून अडीच तासही पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याचे देवकर यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, वीजबिले माफ करावीत आणि शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Khanapur Taluka Drought Affected Farmer Demands
Sangli News : कोल्ह्याच्या हल्ल्यात दृष्टी गमावली; वनविभागाकडून ७.५१ लाखांची भरपाई

शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी शिंदे यांनीही सरकारवर टीका केली. एक-दोन टक्के अधिक पावसाचे कारण देऊन दुष्काळाची गंभीरता नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहराध्यक्ष सुरेश पाटील यांनी दुष्काळ जाहीर न केल्यास नेत्यांच्या गाड्या विटा शहरातून फिरू देणार नसल्याचा इशारा दिला.

या आंदोलनात तालुका उपाध्यक्ष डॉ. विजय मुळीक, अशोक साळुंखे, युवक अध्यक्ष सनी निकम, किसान सेल अध्यक्ष सतीश शिंदे, सेवादलचे मच्छिंद्र महापुरे, शैलजा भिंगारदेवे, शोभा भूमकर, भानुदास सूर्यवंशी, शकील काजी, उद्धव सकटे आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news