Sangli News : गौरी विसर्जनासह घरगुती गणरायाला निरोप

'गणपती बाप्पा मोरयाऽऽ'चा जयघोष : ढोल-ताशांचा निनाद; शहरभर वातावरण भक्तिमय
Sangli News
गौरी विसर्जनासह घरगुती गणरायाला निरोप
Published on
Updated on

सांगली : शनिवारचा दिवस गौरी आणि घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाने भक्तिमय बनला. गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी गौरी विसर्जन असल्याने अनेक घरगुती गणपतींचेही गौरी विसर्जनाबरोबरच विसर्जन करण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील विविध भागात विसर्जन मिरवणुकींची लगबग पाहायला मिळाली. गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्यही मोठ्या प्रमाणावर जमा झाले. महापालिकेच्या केंद्रांवर मूर्ती विसर्जनालाही प्रतिसाद मिळाला.

गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी कुटुंबीयांसह विसर्जनस्थळी हजेरी लावली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ', या घोषाने परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या निनादात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, भक्तिगीते आणि गणरायाच्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह आणि भक्तिभाव निर्माण झाला होता.

गौरीचे विसर्जन आणि त्यासोबत घरगुती गणपतींना निरोप देताना भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साहाबरोबरच बाप्पाला निरोप देताना हुरहुरही दिसून आली. गणरायाच्या आगमनापासून सुरू असलेल्या उत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात करण्यासाठी नागरिकांनी विसर्जनाची तयारी केली होती. दरम्यान, आज, रविवारी सातव्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विसर्जन होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news