

पलूस : येथील कराड-तासगाव महामार्गलगत असलेल्या श्री बॉम्बे पेंट्स या दुकानाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पलूस येथील कराड-तासगाव रस्त्यावरील श्री बॉम्बे पेंट्स या रंगाच्या दुकानाला अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच कामगारांनी रंगाचे डबे बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने सर्वांना बाहेर पडावे लागले. क्रांती कारखान्याची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली, त्यानंतर किर्लोस्कर कारखाना, विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र दुकानातील केमिकल वारंवार पेट घेत होते. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सायंकाळी आग आटोक्यात आणली.