मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ नगर येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. मृतांमध्ये एक 7 वर्षीय मुलगी आणि एका 10 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.