Rahul Mahadik| महाडिक शिक्षण संकुल उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी

राहुल महाडिक; भाजप महायुतीचा शिक्षक-पदवीधर मेळावा
Rahul Mahadik
Rahul Mahadik
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : शिक्षक आणि पदवीधर हे समाजाला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी महाडिक शिक्षण संकुल ठाम आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी केले. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ पेठनाका येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात शिक्षक व पदवीधर मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी राहुल महाडिक बोलत होते. या मेळाव्याच्या माध्यमातून शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या मेळाव्याला शिक्षक, पदवीधर, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे संघटन आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकजूट ही आपली मोठी ताकद आहे. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे.

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारांचे वैयक्तिक संपर्क, संघटनात्मक नियोजन आणि मतदारांशी थेट संवाद हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाडिक बंधूंची भूमिका आणि त्यांच्यामागे उभे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे महायुतीसाठी महत्त्वाचे ठरू शकते. मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्वरूपराव पाटील, भाजप नेते प्रसाद पाटील, जयराज पाटील, अर्जुन साळुंखे, अमोल पडळकर, संदीपराज पवार, पंचायत समिती सदस्य शुभम पाटील व समर्थ पाटील, प्रदीप कांबळे, माजी नगरसेवक सतीश महाडिक, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, केदार नलवडे, राजवर्धन पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, प्रणित कागले, डॉ. व्ही. एस. पाटील, रणजित जाधव, शंकर पाटील, राहुल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, पदवीधर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news