Gopichand Padalkar : आ. गोपीचंद पडळकर यांचा अर्ज अवैध

कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय; माजी आ. विक्रमसिंह सावंत आणि सुजय शिंदे यांचे आक्षेप
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar
Published on: 
Updated on: 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. जत तालुका सोसायटी मतदारसंघातून (अ वर्ग) दाखल करण्यात आलेला त्यांचा उमेदवारी अर्ज कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरवला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीदरम्यान वैध ठरवलेल्या या अर्जाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. निकालानंतर आ. पडळकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा अत्यंत निर्णायक टप्प्यावर आमदार पडळकर यांच्या अर्जाबाबत आलेल्या या न्यायालयीन निर्णयामुळे राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे. सहकारातील पात्रता आणि सभासदत्वाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा कायदेशीर संघर्ष आता तापला असून, या संपूर्ण प्रक्रियेवर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ ऑक्टोबर असून, १ नोव्हेंबरला मतदान आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाला माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातील कुणीकोणूर येथील सर्वसेवा सहकारी संस्थेतील सभासदत्वाची मुदत आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या पात्रतेवर त्यांनी कायदेशीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील सहकारी पतसंस्थेतील संचालक पदाच्या अनुभवाच्या दाखल्यावरही आक्षेप घेण्यात आले होते. हे सर्व आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीवेळी फेटाळून लावत पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news