सांगली; पुढारी वृत्तसेवा : इयत्ता सातवीत शिकणार्या मुलीवर बलात्कार करून जबरदस्तीने तिच्याशी लग्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पीडितेच्या आईचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी तिला अटक
केली.
पीडित मुलीने सांगली ग्रामीण पोलिसांत दि. 7 जूनरोजी फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीची दखल घेऊन संशयित समाधान शिवाजी गायकवाड (वय 25, रा. घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), पीडितेची आई आणि स्वप्नील तानाजी दशवंत (वय 21, रा. घेरडी) या तिघांच्या विरोधात बलात्कार, सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.