

आष्पाक आत्तार
वारणावती : पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अशा सह्याद्री व्याघ्र राखीवचा भाग असलेल्या चांदोली परिसरात पर्यटन वाढत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पाच हजारांवर पर्यटकांनी चांदोली परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक चांदोली आणि परिसराला भेट देतात.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात नाममात्र शुल्क आकारून गाईडच्या माध्यमातून जंगल सफारी करता येते. येथील जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याचा विलोभनीय नजारा यामुळे या ठिकाणचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.
ऑक्टोबरपासून चांदोली अभयारण्यातील झोळंबी सफारी रूट सुरू. चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली धरण हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे मातीचे धरण. 34.40 टीएमसी क्षमता. चांदोली परिसरात संध्याकाळी, सकाळच्या वेळेत बिबट्या, रानकुत्र्याचा वावर. झोळंबी सफारी मार्ग. उदगिरी जंगल सफारी मार्ग. कांडवण धरण जलसफारी. शेवताई मंदिर ट्रेकिंग मार्ग. अंबाबाईदेवी मंदिर देवराई. प्रसिद्ध उखळू धबधबा. उदगिरी धबधबा. विलोभनीय गुढे पाचगणी पठार. उदगिरी पठार आदी.
- अभयारण्यातील जाधववाडी नाका ते विठलाई मंदिर या सफारीदरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती.
- वन विभागामार्फत देशातील इतर व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे उघड्या वाहनांची व्यवस्था.
पक्षी, बिबट्या, नानाविध तसेच दुर्मीळ वनस्पती, कीटक, फुलपाखरे, पतंग, मशरूम, सापांच्या विविध जाती.
1) सांगली मार्गे इस्लामपूर, शिराळा, कोकरूड, शेडगेवाडी, चांदोली. अंतर शंभर किलोमीटर
2) कोल्हापूर मार्गे बांबवडे, कोकरूड, शेडगेवाडी, चांदोली. अंतर 80 किलोमीटर
3)सातारा मार्गे कराड, पाचवड फाटा, शेडगेवाडी, चांदोली. अंतर 60 किलोमीटर