सांगली : जत तालुक्यात माडग्याळ परिसरात गवा रेड्याचे दर्शन

सांगली : जत तालुक्यात माडग्याळ परिसरात गवा रेड्याचे दर्शन

जत, पुढारी वृत्तसेवा : सोन्याळ (ता. जत) येथील एका शेतात गवा रेड्याचा वावर असल्याचे दिसून आले. शुक्रवारी (दि.३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही शेतकऱ्यांना गवा रेडा दिसल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर गवा रेडा लकडेवाडी परिसरात दुपारपर्यंत फिरत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माडग्याळ परिसरातील नवटाकवाडी येथे दाखल झाला होता. परिणामी शेतकरी व नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. गवा रेडा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळपासून या गवा रेड्याच्या मागावर काही शेतकरी होते.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील यांनी वन विभागाचे एक पथक घटनास्थळी पाठवले आहे. वनविभाग गवा रेड्यावर लक्ष ठेवून आहेत. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्या भागात गवा रेड्याचा वावर (वास्तव) नसून सदरचा गवा मंगळवेढा या परिसरातून आला असावा यापूर्वी या ठिकाणी मंगळवेढा परिसरात दिसून आला होता. सदरचा गवा रेडा त्रासदायक नाही. तरीदेखील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news