सांगली : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

file photo
file photo

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : येथील कापरी फाटा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. अनिल अर्जुन कर्ले ( वय ३० , रा.फकिरवाडी , ता.शिराळा ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मयत अर्जुन कर्ले हे आपली मोटारसायकल ( क्रमांक एम एच ०२ डी ए ३७३६ ) वरून शिराळा कापरी नाका येथून बाह्य वळण रस्त्या मार्गावरून फकिरवाडी येथे निघाले होते. यावेळी अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजी पणे येऊन अनिल कर्ले यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट दिली तसेच अज्ञात वाहनाचा शोध घेतला. अज्ञात वाहन व अज्ञात चालक याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्जुन कृष्णा कर्ले ( वय ६०) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तपास हवालदार सुनील पेटकर हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news