सांगली : नळावरच्या भांडणात वृद्ध दाम्पत्यास मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

विटा, पुढारी वृत्तसेवा : पाण्याच्या टाकीच्या नळावर झालेल्या भांडणात वृध्द पती-पत्नीला चौघांनी काठीने मारहाण केली. ही घटना बलवडी (खा) येथे रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत संबंधित वृद्ध लक्ष्मण महादेव गायकवाड (वय ८०) यांनी विटा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल हणमंत गायकवाड, लता अनिल गायकवाड, डुल्या ऊर्फ प्रदिप अनिल गायकवाड, पूजा अनिल गायकवाड (सर्व रा.बलवडी (खा),ता.खानापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, वृद्ध लक्ष्मण गायकवाड यांची पत्नी अनुसया ही घराजवळील शाळेच्या पाण्याच्या टाकीवर पाणी भरायला गेली होती. या वेळी शेजारीच राहत असलेली पूजा गायकवाड ही तेथे आली आणि अनुसया यांनी लावलेली कळशी जबरदस्तीने बाजूला काढली आणि स्वत: ची कळशी लावली. त्यावर अनुसया यांनी पूजाला असं का केलंस म्हणून विचारले तिने अनुसया यांना मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन भांडण सुरू केले.

त्यावर अनुसयांचे पती लक्ष्मण गायकवाड यांनी तिथे येऊन पूजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुजाचे वडील अनिल गायकवाड, आई लता आणि भाऊ प्रदीप यांनी तिथे येऊन वृद्ध लक्ष्मण आणि अनुसया यांना शिवीगाळ केली. तसेच पूजा आणि लता गायकवाड यांनी वृद्ध दाम्पत्यास काठीने मारहाण करुन जखमी केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news