सांगली : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळाला, लाखोंचे नुकसान

सांगली : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळाला, लाखोंचे नुकसान

बोरगाव, पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील डांगे पानंद रस्त्यालगत शॉर्टसर्किटने आग लागून १५ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये ९ ते १० शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.११) दुपारी १२ च्या दरम्यान घडली.
आग आटोक्यात आणण्यासाठी राजारामबापू कारखान्याचे व इस्लामपूर नगरपालिकेने अग्निशामक दलाने व उपस्थित शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. अन्यथा आगीचा वणवा अधिक भडकला असता. या आगीत नामदेव विष्णू डांगे, बाबासाहेब विष्णू डांगे, हनुमंत विष्णू डांगे, सचिन सदाशिव डांगे, मारुती तुकाराम पवार, प्रमोद शंकर पवार, बाबासो खाशाबा नाईक, प्रवीण माणिक नाईक या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचा अंदाजे १५ एकर ऊस जळून खाक झाला आहे. सदर शेतकऱ्यांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news