Chandrakant Patil| पुणे पदवीधरमधील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील

चंद्रकांत पाटील यांचा विश्वास; पेठ येथील बूथला भेट
Chandrakant Patil
पेठ : येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बाजूस राहुल महाडिक, सम्राट महाडिक
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे हे महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेठनाका (ता. वाळवा) येथील बूथवर भेट दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पेठ येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभम पाटील, शंकर पाटील, बबन शिंदे, जगन्नाथ माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी पत्नी तेजस्वी महाडिक, मातोश्री मीनाक्षी महाडिक तसेच जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी पत्नी हर्षदा महाडिक यांच्यासह पेठ येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news