Palus accident : पलूसमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

इंगळे तलावाजवळ अपघात; एक गंभीर जखमी
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

पलूस : पलूस-आंधळी मार्गावरील इंगळे पाझर तलावाजवळ स्कूल बस आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार रमेश रामलिंग तांबारे (वय 40, रा. पलूस) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सुहास अनिल कदम (रा. कदम मळा, बांबवडे, ता. पलूस) हे गंभीर जखमी झाले आहेेत. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रमेश तांबारे आणि सुहास कदम हे गुरुवारी दुपारी दुचाकीवरून (क्र. एमएच 10 इएस 5607) आंधळी फाट्याकडून पलूसकडे येत होते. यावेळी पलूसकडून येणारी स्कूल बस (क्र. एमएच 10 के 9446) कोयना वसाहतीकडे वळण घेत होती. इंगळे पाझर तलावाजवळ अचानक दुचाकीची बसच्या डाव्या बाजूला जोरदार धडक बसली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तांबारे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी सुहास कदम यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत रमेश तांबारे यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. अपघाताची नोंद पलूस पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news