Dr. Smita Jadhav : शरद लाड, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांच्या कार्यकर्त्यांचा ‘त्रिवेणी संगम’!

डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी एकजूट; मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
Sangli News
पलूस : येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षनिरीक्षक गणेश पाटील, बाजूस माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम.
Published on: 
Updated on: 

पलूस : भाजपचे शरद लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकत्र येत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पलूसमधील शिक्षक कॉलनी येथे पक्षनिरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत तीनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा ‘त्रिवेणी संगम’ पाहायला मिळाला.

बैठकीत पक्षनिरीक्षक गणेश पाटील यांनी भाजपसह महायुतीतील सर्व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी काम केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम म्हणाले, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रचारात सक्रिय राहिले पाहिजे.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील आणि सागर नलावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस भाजपाचे सागर सुतार, सुभाष सुतार, संजय येसुगडे उपस्थित होते. स्वागत महेश सुतार यांनी केले, तर रामानंद पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news