Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांच्या समर्थनार्थ पलूस तालुक्यात महिला राष्ट्रवादीची प्रचारफेरी

घरोघरी जाऊन पदवीधर मतदारांच्या घेतल्या भेटी
Dr. Smita Jadhav
डॉ. स्मिता जाधव यांच्या समर्थनार्थ पलूस तालुक्यात महिला राष्ट्रवादीची प्रचारफेरी
Published on: 
Updated on: 

पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला कार्यकर्त्या मैदानात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस, रामानंदनगर, अंकलखोप आणि भिलवडी परिसरात प्रचाराचा धडाका सुरू आहे. महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन पदवीधर मतदारांच्या भेटी घेत असून, बुधवार, दि. २१ रोजी डॉ. स्मिता जाधव यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करून त्यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले.

मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला असून, गावा-गावांत तसेच विविध वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला जात आहे. पदवीधरांच्या समस्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सक्षमपणे काम करू शकणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवाराला संधी देण्याचे आवाहन या माध्यमातून होत आहे.

या प्रचार मोहिमेमुळे पलूस तालुक्यातील विविध गावांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या मोहिमेत मंजिरी शिंदे, रेणुका मिरेकर, दिव्या मोहिते, प्रगती यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर संस्था डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना बुधवारी पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर संस्थेच्यावतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ पंडित विष्णू दिगंबर महाविद्यालयात गाठीभेटी घेण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, बळीराम पोतदार, सुनील पुदाले, यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम, सर्जेराव नलवडे, यशवंत कदम, संजय शिंदे व प्रशांत बुचडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news