Pudhari Shopping and Food Festival: ‘मिसेस कस्तुरी‌’ स्मिता डुबल, तर ‌‘मिस कस्तुरी‌’ सरगम आकळे

‘पुढारी‌’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये स्पर्धा; आज शेवटचा दिवस
Pudhari Shopping and Food Festival
Pudhari Shopping and Food FestivalPudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात दै. ‌‘पुढारी‌’च्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये ‌‘मिस अँड मिसेस कस्तुरी उरुण-ईश्वरपूर‌’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्मिता दिग्विजय डुबल यांनी ‌‘मिसेस कस्तुरी‌’, तर सरगम रोहित आकळे यांनी ‌‘मिस कस्तुरी‌’चा बहुमान पटकावला. स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.

दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘प्रतिराज युवा शक्ती‌’ हे फेस्टिव्हलचे आयोजक आहे. उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेतील महिला व बालकल्याण समिती व तनिष्का फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य हे या फेस्टिव्हलचे सहयोगी प्रायोजक आहेत. आज, मंगळवारी फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे.

रविवारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव यांनी या फेस्टिव्हलला भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला. उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव, स्नेहल नायकवडी, नगरसेविका शुभांगी शेळके, सिनिअर एक्झिक्युटिव्ह मधू देसावळे, कस्तुरी जाधव, परी जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

फॅशन शो, तसेच मिस कस्तुरी व मिसेस कस्तुरी स्पर्धेने कार्यक्रमाची रंगत वाढवली. स्पर्धेत 30 महिलांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. स्पर्धकांनी फॅशन शोमध्ये पारंपरिक, इंडो वेस्टर्न अशा वेशभूषेत सहभाग नोंदविला. ‌‘मिसेस कस्तुरी‌’ स्पर्धेत ऐश्वर्या अक्षय नायकल यांनी द्वितीय, तर वर्षा हणमंत फाटक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ‌‘मिस कस्तुरी‌’ स्पर्धेत शिवानी भगवान पाटील यांनी द्वितीय, तर वैदेही नितीन पारेख यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

पूजा मुडलगी या ड्रेसच्या प्रायोजक होत्या. वेदिका ज्वेलरी वन ग्रॅमचे भारत पाटील ज्वेलरीचे प्रायोजक होते. फॅशन शो व स्पर्धेसाठी सुनील चव्हाण, संग्राम कांबळे कोरिओग्राफर होते. दीपाली पाटील, निकिता रावल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

फेस्टिव्हलमध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक आदी वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. शिवाय शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहे. चविष्ट डिशेस, चौपाटीचे प्रसिद्ध पदार्थ, साऊथ इंडियन डिशेस, बर्गर, सँडविच आदी फास्टफूड आणि अशाच वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल आहेत. मुलांसाठी खेळणी उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news