Prashant Thakur | डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य द्या : आमदार प्रशांत ठाकूर

कडेपूर येथे मेळावा
Prashant Thakur | डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य द्या : आमदार प्रशांत ठाकूर
Published on: 
Updated on: 

कडेगाव : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना कडेगाव-पलूस मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. या निवडणुकीसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल कडेपूर (ता. कडेगाव) येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कडेगाव शहराध्यक्ष तथा नगरसेवक संदीप गायकवाड, मुंबईचे नगरसेवक गणेश पाटील, सुरेंद्र गुजर, पनवेल विधानसभा भटक्या विमुक्त जाती भाजपचे अध्यक्ष उत्तम जरग, सागर गायकवाड उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news