Sangli Dance Bar : डान्सबारसाठी रसद आली कुठून?

परवानगीसाठी लाखो रुपयांची एंट्री : खात्यातील कारभाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल
Dance Bar
Dance BarPudhari
Published on
Updated on

मिरज : म्हैसाळ-विजयनगर (ता. मिरज) येथील राही पॅलेस डान्सबार सुरू करण्यासाठी डान्सबार चालकाने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील काही अंमलदारांना लाखो रुपयांची एंट्री दिल्याची खात्यात चर्चा आहे. तसेच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या डान्सबारची कल्पना न देताच काही अंमलदारांनी परस्पर डान्सबार सुरू करण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

मिरज ग्रामीण पोलिस ठाणे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत आहे. गेल्यावर्षी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी फिर्यादीच्या रकमेवरच काही अंमलदारांनी चांगलाच हात मारला होता.

लाखो रुपयांच्या वाटणीमध्ये अनेकजण असल्याने ते प्रकरण दाबले गेले होते.परंतु, आता डान्सबारचे प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजल्याने मिरज ग्रामीण पोलिसांचे नाक पूर्णपणे कापले गेले आहे. या ठिकाणी डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. परंतु वरिष्ठांना कल्पना न देताच अनेक अवैध धंदे काही अंमलदारांनी परस्पर सुरू केल्याची चर्चा आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीमध्ये अवैध धंदे बंद आहेत, असे सांगितले जाते. परंतु डान्सबारसारखे एवढे मोठे कांड काहीजणांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केले का? याची भनक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

सांगली, मिरज शहरासह मिरज तालुक्यामध्ये सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे जोरदार सुरू आहेत. यापूर्वी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छमछम सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्याची बातमी छमछम सुरू होण्यापूर्वीच फुटली. त्यामुळे तो विस्कटला होता.

परंतु, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे नियुक्तीस असणाऱ्या चाणाक्ष अंमलदारांनी याची भनक या कानाची त्या कानाला लागू दिली नव्हती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडील काही जणांना मोठी रसद देऊन हा डान्सबार सुरू झाल्याची चर्चा खात्यामध्येच सुरू आहे. लाखो रुपयांची एंट्री डान्सबार सुरू होण्यापूर्वी देण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news