Miraj: मिरजेत चाकू घेऊन फिरणार्‍यास अटक

Miraj: मिरजेत चाकू घेऊन फिरणार्‍यास अटक

मिरज पुढारी वृत्तसेवा : मिरजेत रिक्षातून धारदार चाकू घेऊन फिरणार्‍या सोहेल निहाल शेख (वय 30, रा. सारवान गल्ली, मिरज) या रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेली महिती अशी की, वाहतूक पोलिस सुमित सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रिक्षा चालकाच्या कंबरेला धारदार चाकू अडकविलेला दिसला. सूर्यवंशी यांना संशय आल्याने त्यांनी शेख याच्याकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी सूर्यवंशी यांनी याबाबत तातडीने मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती दिली. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोेंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news