

शहरातील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या चार दिवसापासून बिबट्याने परिसरात तळ ठोकला आहे. वन विभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे. परिसरात ठिकठिकाणी वन विभागाकडून कॅमेरे लावले आहेत. त्याच्या शोधासाठी पथकेदेखील तैनात केली आहेत.
सांगली शहरालगतच्या विस्तारित वानलेसवाडी परिसरात नागरी वस्तीसह शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे उसामध्ये आसरा घेऊन राहिलेले बिबटे आता बाहेर पडू लागले आहेत. सांगली शहराच्या विस्तारित भागात असणार्या वानलेसवाडी परिसरात दि. 14 रोजी नागरिकांना बिबट्या दिसला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यादरम्यान रात्री गस्तीवर असणार्या एका पोलिसालाही बिबट्या दिसला.
त्यामुळे बिबट्याच्या येथील वावरास पुष्टी मिळाली. चार दिवसापासून या बिबट्याचा शोध सुरू असूनपूर्ण वाढ झालेला बिबट्या वानलेसवाडी परिसरामध्ये आढळून आलेला बिबट्या हा पूर्ण क्षमतेने वाढ झालेला असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. ज्या शेतामध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत, ते ठसे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे असल्याचेही वन विभागाकडून सांगण्यात आले.
ऊस शेतीचा आसरा घेत बिबट्या वानलेसवाडीत वानलेसवाडी, धामणी, अंकली या राष्ट्रीय महामार्गालगत असणार्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसशेती आहे. तसेच हरिपूरही अंकलीलगत असल्याने याच परिसरातून बिबट्या ऊस शेतीचा आसरा घेत वानलेसवाडी परिसरात आला असण्याची शक्यता आहे.