Sangli News : कोल्हापूरची ‌‘घरघर‌’ एकांकिका ठरली सर्वोत्कृष्ट

ईश्वरपूर येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; ‌‘ग्वाही‌’ द्वितीय, ‌‘पाकळ्या‌’ तृतीय
Sangli News
ईश्वरपूर : येथील विजेत्या संघास बक्षीस देताना उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, प्रा. शामराव पाटील, उद्योजक राकेश दामाजी मोरे, धैर्यशील पाटील, कल्पना कुंभार, उद्योजक संजय करांडे आदी.
Published on
Updated on

ईश्वरपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा ईश्वरपूर आयोजित ‌‘जयंत करंडक‌’ रौप्यमहोत्सवी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरच्या सोहम प्रोडक्शन निर्मित ‌‘घरघर‌’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्टतेचा मान पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून 26 संघांनी सहभाग नोंदवला होता.

एकांकिका स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोहम प्रोडक्शन, कोल्हापूर ‌‘घरघर‌’ एकांकिकेने पटकावला. द्वितीय क्रमांक देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूरच्या ‌‘ग्वाही‌’ एकांकिनेने पटकावला. तृतीय क्रमांक नक्षत्र कलामंच, मुंबई यांच्या ‌‘पाकळ्या‌’ एकांकिकेने पटकावला. नटरंग ग्रुप, ईश्वरपूरचा ‌‘बा अदब बा मुलाहीजा‌’ उत्कृष्ट स्थानिक प्रयोग ठरला. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, ईश्वरपूरची ‌‘हाफवे‌’, अभिरुची, कोल्हापूरची ‌‘ठोंब्या‌’ आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूरची ‌‘वात्सल्यम‌’ एकांकिका उत्तेजनार्थ ठरली. उत्कृष्ट दिग्दर्शक गटात प्रमोद पुजारी यांनी प्रथम, विशाल चव्हाण यांनी द्वितीय, जितेंद्र देशपांडे यांनी तृतीय क्रमांकाच पारितोषिक पटकावले.

उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी विकास कांबळे, विजय मस्के, अभिषेक हिरेमठ-स्वामी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. आरव गुळवणी, कुलदीप मोहिते, यश शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितेषिक मिळाले. उत्कृष्ट स्त्री अभिनयासाठी अक्षता बारटक्के, सई जाधव, कृष्णा पंडित. यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. श्रावणी मोरे, वैष्णवी कुंभार, सुप्रिया पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. नवीन संहिता लेखन गटात श्रुती साळुंखे आणि अनंत हंडीफोड यांनी पारितोषिक पटकावले.

तांत्रिक बाजूमध्ये संगीतासाठी संदीप घुगरे, विकास गुळवणे, विजय पाठक यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. नेपथ्यासाठी ओमकार वडके, परितोष ठाकर, कोमल पाटसकर, मंगेश विधाते यांनी पारितोषिक पटकावले प्रकाश योजना गटात आशिष भागवत, निखिल मारणे, चेतन ढवळे, तर रंगभूषा गटात विद्या पाटील, ज्योतिबा बडे यांनी पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे परीक्षण सुहास जोशी (पुणे), संदीप जंगम (सातारा) आणि प्रा. प्रकाश जाधव (ईश्वरपूर) यांच्याहस्ते करण्यात आले. विजेत्यांना उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, प्रा. शामराव पाटील, उद्योजक राकेश मोरे, धैर्यशील पाटील, कल्पना कुंभार, मनीषा पेठकर, संजय करांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news