Sangli Tractor Accident | जीवावर आलं… पण बरगडीवर निभावलं! स्टंटबाजी करताना ट्रॅक्टर चालक सापडला चाकाखाली

मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतात नांगरणी करताना घटना
kavathe mahankal tractor accident
kavathe mahankal tractor accidentPudhari
Published on
Updated on

kavathe mahankal tractor accident

कवठेमहांकाळ : मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे सोमवारी (दि. १८) ट्रॅक्टरखाली शरीर गेल्यानंतरही विजय माळी या चालकाचा जीव वाचल्याने गावात जीवावर आलं… पण बरगडीवर निभावलं, अशीच चर्चा रंगली होती.

मळणगाव येथील विजय अण्णाप्पा माळी हे सोमवारी दुपारच्या सुमारास गावातील मोहन सुतार यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेले होते. शेतात ट्रॅक्टरवर हिंदी गाण्यांचा फुल्ल आवाज सुरू होता आणि त्याच तालावर नांगरणीही रंगात आली होती.

kavathe mahankal tractor accident
Sangli News : अंधारातून खड्डे चुकवण्याची कसरत

दरम्यान, चालू ट्रॅक्टरमधून खाली उतरून पुन्हा ट्रॅक्टरवर चढण्याची हुक्की चालक विजय माळी यांना आली. मात्र ही हौस चांगलीच महागात पडली. खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला. पुन्हा ट्रॅक्टरवर चढताना पाय घसरल्याने ते थेट खाली कोसळले. क्षणार्धात ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. हा थरार पाहून शेतातील नागरिकांची एकच धावपळ उडाली.

सुदैवाने भीषण अपघातातून विजय माळी थोडक्यात बचावले. त्यांच्या तीन ते चार बरगड्या मात्र मोडल्या आहेत. अपघातानंतर तातडीने कवठेमहांकाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी भारती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news