

वारणावती : शिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल जीर्ण झाल्याने कोसळला. गेल्या महिनाभरापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेमुळे करुंगली-गुंडगेवाडी, खोतवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. हा पूल वारणा डाव्या कालव्यावर होता. या पुलामुळे करुंगली - गुंडगेवाडी, खोतवाडी गावे जोडली गेली होती. गेल्या महिन्यात हा पूल धोकादायक झाला होता. येथील स्थितीची वस्तुस्थिती मांडत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध केले होते. त्यामुळे संबंधित विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.
पूल कोसळल्यामुळे वरील अनेक वाड्या -वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. या गावांना जोडणार्या पर्यायी पुलाची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.