Jayant Patil-Gopichand Padalkar: जयंत पाटील, पडळकर समर्थक आमने-सामने

झेडपीसमोर तणाव : पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
Jayant Patil Gopichand Padalkar
Jayant Patil Gopichand Padalkarfile photo
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रदेशद्वारात एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवले आणि संभाव्य अनुचित प्रकार टळला.

अध्यक्ष निवडीसाठी पडळकर भाजप नेत्यांसह जिल्हा परिषदेत उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडत असताना आ. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‌‘आमदार जयंत पाटील वाघ आहेत‌’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‌‘एकच छंड गोपीचंद‌’ अशा घोषणा पडळकर यांच्या समर्थकांनी दिल्या.

या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी अर्वाच्य शब्दांचाही वापर केला. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गटांतील तणाव वाढत असतानाच स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्याचवेळी गर्दीतून पडळकर निघून गेले, मात्र काही काळ घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना पांगवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news