

Sangli Zilla Parishad Election Results
सांगली: सांगली जिल्ह्यात हुकूमशाही सुरू होती. गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते. वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्या प्रयत्न केला जात होता. शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात आहेत. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने माय बाप जनतेचे आभार व्यक्त करतो.
जिल्ह्यात हुकूमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते, वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्या प्रयत्न केला जात होता तसेच शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात आहेत. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे.
सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही. आपल्या जिल्ह्याची ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनतेचे पुनश्च एकदा आभार.
ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीचे पानिपत केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने येथे 22 पैकी 14 जागा जिंकत वाळवा पंचायत समितीवर पुन्हा वर्चस्व मिळवले . तर जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 8 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक 18 जागा मिळालेल्या आहेत.