रामगिरी महाराजांना अटकेसाठी जतमध्ये मोर्चा

मुस्लिम समाज आक्रमक : वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध
Sangli News
जत : रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे काढलेला मोर्चा.Pudhari Photo
Published on
Updated on

जत शहर : पुढारी वृत्तसेवा

रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वकतव्य केल्याच्या निषेधार्थ जत तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रामगिरी महाराज यांना तातडीने अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.याबाबतचे निवेदन जत प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार पंडित कोळी व जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांना देण्यात आले. मोर्चात शहर, तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Sangli News
रामगिरी महाराजांवर कारवाई करा

रामगिरी महाराज यांच्या वकतव्याचा निषेध नोंदविण्यात आला. मोर्चातील सहभागींनी जत तहसील कार्यालयासमोर एकत्र येत ठिय्या मारला. बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, मुस्लिम समाज शहराध्यक्ष मकसूद नगारजी, सलीम गवंडी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष डॉ. शफिक इनामदार यांची भाषणे झाली.

Sangli News
सिल्लोड येथे रामगिरी महाराजांचे स्टेटस ठेवल्याने तरुणाला मारहाण

या आंदोलनास आमदार विक्रमसिंह सावंत, जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडग, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ढोणे यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी हाजी बंदेनवाज पटाईत, मेहबूब गवंडी, मौलाना आरिफ, आसिफ मकानदार, मुन्ना पकाली, मुफ्ती युनुस मुल्ला, बंडू शेख, सद्दाम अत्तार उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news